त्या मजुरांची मजुरी देन्यात यावी अन्यथा आंदोलन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीचा इशारा.

181

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीचा इशारा

गडचिरोली:- मौजा कुरुड येथील सन २०२३ वन विभाग स्टेट कॅम्पा योजने मार्फत केलेल्या नर्सरी (झाडे लावणे, विर्डींग) च्या कामाच्या मजुरांची मजुरी देण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. उपवन संरक्षण अधिकारी वनविभाग गडचिरोली यांना अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली च्या वतीने देण्यात आले.

वन परिक्षेत्र कुनघाडा रै. उपक्षेत्र जोगणा मार्फत कक्ष क्र.२ मध्ये क्षेत्र २०.०० हे आर या राखीव जंगलामध्ये नर्सरी मध्ये नर्सरी (झाडे लावणे, वीर्डींग) काम करण्यात आले. परंतु सहा महिने लोटूनही मजुरी मिळाली नाही.

एकिकडे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसुन शासन सुद्धा त्यांच्या कडे दुर्लक्ष करतांना दिसतो आहे. आज महागाई मुळे सर्व सामान्य जनता त्रस्त असुन ६ महिने लोटूनही मजुरांना कमाची मजुरी मिळेना हा मजुरवर्गा वर खूप मोठा अन्याय आहे.

या पूर्वीही या मागणीचे निवेदन २७/०१/२०२३ रोजी दिले परंतु मजुरांची मजुरी मिळाली नसुन तात्काळ येत्या दहा दिवसात मजुरांची मजुरी देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचा वतीने देण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल भाऊ कोवे,कैलास गेडाम,अक्षय वाढई,भुषण मसराम,आदित्य येरमे उपस्थित होते.