सिरोंचा येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीच्या फोटोला पुष्पहार घालून अटल जयंती साजरी

61

 

सिरोंचा :ये परंपरा का प्रवाह है कभी न खंडित होगा,
पुत्रों के बल पर ही मां का मस्तक मंडित होगा!!
– श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींच्या या वाक्याची स्मरण करून भारतीय राजकारणातील सुशासनाचे प्रणेते, अत्यंत प्रभावी आणि मुत्सद्दी नेतृत्व, करोडो भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक, माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन करीत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सिरोचां येथील मुख्य चौकात अटल जयंती साजरा केले.भाजपाच्या सर्व पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले.

यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!