राजू मेश्राम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार #jantechaawaaz#news#portal#

57
प्रतिनिधी//
मूळचे महागाव खुर्द ता.अहेरी जि.गडचिरोली येथील रहिवासी असलेले व सध्या जि.प.प्राथमिक शाळा म्हाते बु.।। ता.जावली जि.सातारा याठिकाणी कार्यरत असलेले हरहुन्नरी शिक्षक श्री. राजू मेश्राम यांना जावली पंचायत समितीच्या वतीने जावळी-सातारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


















दुर्गम भागातील तळदेव मायणी याठिकाणी काम करत असताना ज्ञानरचनावाद तसेच बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले व लोकसहभागातून भौतिक सुविधा निर्माण केल्या. म्हाते बु.।। याठिकाणी काम करतांना तंत्रस्नेही शिक्षक,शिष्यवृत्ती मार्गदर्शक,  विविध वृत्तपत्रे व प्रातिनिधिक कवितासंग्रहातून कविता व इतर लेखन, विद्यार्थ्यांचा हस्तलिखित कवितासंग्रह,प्रयोगातून शिक्षण, इंग्रजी वाचन उपक्रम, हस्ताक्षर सुधार प्रकल्प,ऑनलाईन प्रश्नपेढी व व्हिडीओ निर्मिती, केंद्रस्तर शिक्षण परिषदांतून मार्गदर्शन, असे विविध उपक्रम राबवत शाळेच्या सर्वांगीण विकासात विशेष योगदान दिले.याशिवाय एम.ए.,बी.एड. सेट अशी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केली. या चौफेर कार्याची दखल घेत शिक्षण विभाग पंचायत समिती जावळी यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
  
या यशाबद्दल सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत महागाव खुर्द तसेच पोलीस पाटील सौ.चंद्रकला समय्या कोडापे, काशिनाथ मेश्राम,दशरथ मेश्राम, गणेश चौधरी, श्रीनिवास आलाम,बाबुराव गालपल्लीवार,विलास मेश्राम,श्रीहरी आलाम,किष्टय्या मेश्राम, अजय मेश्राम,कारू सोनटक्के,हनमंतु मेश्राम, समय्या कोडापे,तुकाराम नैताम, स्वस्तिक कोडापे,संजय सिडाम,संतोष मडगुलवार व मित्र,परिवार यांनी अभिनंदन केले.