अब… अब..अब.. तलाठी दारुच्या नशेत बजावतोय कर्तव्य तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

560

 

  1. तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

अहेरी : मुख्यालयात न रहाता व नेहमी दारुच्या नशेत आपले कर्तव्य बजावणाऱ्या व जाणे-येणे करणाऱ्या तलाठी *मनिराम तिसरा मडावी* यांचेवर कार्रवाई करा अशी मागणी .*आलापल्ली* येथील ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, अहेरी तालुका अतिदुर्गम, अतिसंवेदनशिल आणि मागासलेला आहे. या तालुक्यात ९० टक्के आदिवासी जनता वास्तव्याने आहे. ही जमात अशिक्षित, अल्पशिक्षित आहे. याचा फायदा घेवून तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सर्रासपणे जाणे-येणे करत आपल्या मुख्यालयात नाही राहत. त्यामुळे येथील आदिवासी नागरिकांना व विध्यार्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यात जवळपास १५०च्या वर लहान मोठे गाव आहेत. या गावांना तालुक्यातील विविध ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तलाठी साझे, वनपरिक्षेत्र कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाने इत्यादी जोडलेले आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेला कोणताच अधिकारी व कर्मचारी आपल्या मुख्यालयी राहत नाही. सोयीच्या जसे एटापल्ली, अहेरी,
आलापल्ली येथून येणे-जाणे करतात. पहिलेच सरकार ने ५ दिवसांचा आठवडा केला आहे. अशात हे कर्मचारी आठवड्यातून एक या दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात जातात. त्यामुळे तेथील नागरिकांना व विध्यार्थांना त्रास सहन करावा लागतो. कार्यालयाची वेळे सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.१५ अशी करण्यात आली आहे. परंतु हे अधिकारी कर्मचारी सकाळी ११ च्या नंतरच कार्यालयात पोहचतात आणि सायंकाळी ५ वाजता निघुन जातात. त्यामुळे नागरिकांना व विध्यार्थांना आपल्या कामासाठी कार्यालयात वाट पहावी लागते. त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यावर मुख्यालयात राहण्याची सक्ती करावी व मुख्यालयात न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कडक कार्रवाई करावी व….. या गावातील तलाठी हे नेहमी दारुच्या नशेत असतात आणि वेळेवर कार्यालयात येत नाहीत आणि शेतकऱ्यांना व विध्यार्थांना दाखले नेहमी तलाठ्याचे दाखले लागतात तर…… या गावातील तलाठी कधी येतो तर कधी येतच नाही आले तर दारुच्या नशेत राहतात साहेब काल परवा काऊन नाही आले जी म्हणून विचारले असता उद्धटपणे बोलतात करीता अशा या दारुच्या नशेत राहणाऱ्या बेजबाबदार तलाठ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे

 

बॉक्स

सदर व्यक्ती मुळेशाळकरी मुलांचे नुकसान होऊन राहिले नेहमी मध्यधुंद अवस्थेंत राहतो आपल्या कामाकडे दुर्लक्ष करतोय अश्या बेजवाबदर व्यक्तीला निलंबित करण्यात यावा

भाजप युवा नेता

अभिजित जयप्रकाश शेंडे