येंकापल्ली गावाचे पुनर्वसन करा दरवर्षी पुराचा फटका बसतो

71

दरवर्षी पुराचा फटका बसतो
*अहेरी*:-नजीकचे येंकापल्ली गावाला दरवर्षी पुराचा फटका बसतो , त्यामुळे पावसाळ्यात येंकापल्ली गाव वासियांचे अतोनात नुकसान व ससेहोलपट होत असते गावाच्या लगत आबादी जागा असून येंकापल्ली गावाचे पुनर्वसन करून देण्याची एकमुखी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार यांच्या नेतृत्वात गाव वासियांनी गुरुवारी येथील अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, सन 1986 पासून सतत पावसाळ्यात येंकापल्ली गावाला पुराचा फटका बसत असून गाववासीयांचे पावसाळ्यात जनजीवन विस्कळित होत असतो गावाच्या लगतच सुरक्षित व आबादी जागा असून त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची एकमुखी मागणी गाववासीयांनी अप्पर जिल्हाधिकारी, अहेरी यांच्याकडे निवेदना द्वारे केले आहे यावेळी बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.