देसाईगंज/प्रतिनिधी भुवन भोंदे::- अलगद प्रॉडक्शन्स या यूट्यूब चॅनल वरती प्रदर्शीत झाली आहे. हे लघुपट आता येणाऱ्या २६ नोव्हेंबर ला संविधान दिनानिमित्त तयार केले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते प्रतिक देवाजी लाडे असून ते देसाईगंज वडसा तालुक्यातील जुनी वाडसा या गावचे आहेत. त्यांनी व त्यांच्या संपूर्ण टीम नी अतीशय मोलात्मक संदेश देणारी लघुपट तयार केलेली आहे.
या लघुपटात विक्की राऊत, मयंक मेश्राम, अविनाश रघोर्ते आणि अमोल राहाटे हे नवनवीन युवा कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत. आणि याचे दिग्दर्शन प्रतिक लाडे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करणे हे या काळात काही लोक फक्त एक फॉर्मालिटी म्हणून मानतात. बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ येऊन खोटी खोटी मानवंदना केली की झालं! पण बाबासाहेबांच्या पुस्तकांकडे कोणी लक्ष देत नाहीत त्यांची पुस्तकं सहसा ती माणसं वाचत नाहीत.
खरे बाबासाहेब जर शोधायचे असतील तर ते पुतळ्यात नसून ते त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकात मिळतील. ज्यात त्यांचे विचार आताही जिवंत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे आपल्याला सर्व काही दिले आहे. सर्व अधिकार दिलेले आहेत. पण तरीही, आपल्या देशातील कित्येक समाजातील लोक आणि विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी लढत आहेत. दलीत समजातील आणि इतर मागासवर्गीय लोकांना सुद्धा त्यांचं हक्क हे सहजा सहजी मिळत नाही तर ते त्यांना मागावं लागत आहे.
शिक्षण घेणे हा सामान्य माणसाचा एक अधिकार आहे. आणि शिक्षण घेतल्यावर त्यांना नौकरी मिळणे हे सुद्धा त्यांचं संविधानिक अधिकार आहे. परंतू आजकाल आपल्या देशात चालत असलेल्या घाणेरड्या राजकारनामुळे या देशातल्या सुशिक्षित विद्यार्थांना, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि त्यामुळे ते विद्यार्थी या तणावामुळे आत्महत्या करतात किव्वा मग ते मानसिक रोगी होतात. या गोष्टी कडे सरकार ने दखल घ्यायला हवी. हीच गोष्ट अधिकाराचा लढा या लघुपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे या लघुपटाचे दिग्दर्शक प्रतिक लाडे यांनी सांगितले आहे.