पूर्व सूचना न देता पाणी सोडण्यात आलेल्या मेडिगड्डा धरणाचा फटका बसलेल्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या ; रा,काँ,पक्षाचे ता,उपाध्यक्ष – सागर मूलकला यांची मागणी .

82

 

सिरोंचा :- तेलंगणा शासनाने महाराष्ट्र हद्दीत पोचमपल्ली गावाजवळ बांधण्यात आलेल्या मेडिगड्डा धरणामुळे सिरोंचा परिसरातील शेतकरी, नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
या प्रकल्पाचा सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना जबर फटका बसला आहे ,
या धरणाच्या पाण्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न होता संपूर्ण फायदा हा
तेलंगाणाला होत आहे.
तसेच या धरणाचे पाणी सोडल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे.
मात्र शासनद्वारे नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
गेल्या शनिवारीच्या दिवशी संध्याकाळीच्या दरम्यान अचानक मेडिगड्डाच्या बरेजच्या ६ व्या ब्लॅकमधील १५ व्या पिलरवरून २१ व्या खांब कोसळल्याने संबंधित व्हिडीओ आणि फोटोस व्हायरल होऊन खळबळ उडाली आहे,
ही घटना घडताच संबंधित मेडिगड्डा धरणाचे अधिकाऱ्यांनी कोणत्याही पूर्व सूचना न देता खाली भागात पाणी विसर्ग केल्याने खाली भागात असलेल्या गावातील शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे,
मासेमारी करणाऱ्याचे साहित्यसह आणि शेतकऱ्यांचे पाण्याची मोटार पंप्स व इतर साहित्यचे पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाली आहे,
शासनाने मेडिगड्डा धरणाच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी निवेदन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष – अतुल गण्यारपवार ,तालुका अध्यक्ष – फाजील पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली ,तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांनी तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री- एकनाथ शिंदे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री – देवेंद्र फडणवीस,
जिल्हाधिकारी – संजय मीना,तसेच कॅबिनेट मंत्री – धर्मरावबाबा आत्राम यांच्या कडे निवेदन पटवून मागणी केली आहे,
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गटाचे)पदाधिकारी – विनोद नायडू, सलमान शेख, अडपा मल्लय्या, यांची उपस्थिती होते,

तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम