प्रतिनिधी//
आलापल्ली ते अहेरी रोड बांधकामात कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तसेच अधिकारी यांना निलंबित करावे या मागणीसाठी समाजवंती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार हे आला पण येथील
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनावर बसले आहेत. सदर आंदोलन हे आज सहा ऑक्टोबर रोजी ही सुरू असून या आंदोलनाला आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची गडचिरोलीला अध्यक्ष किशोर शंभरकर यांनी भेट दिली.
सदर ठिया आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आलापल्ली अहेरी रस्त्यावर झालेल्या कधीत भ्रष्टाचारची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत