मी आधी समाजाचा, नंतर पक्षाचा ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन #jantechaawaaz#news#portal#

72
प्रतिनिधी//
एटापल्ली :*– अनुसूचित जमाती च्या राखीव आरक्षणातून धनगरांना आरक्षण देण्यास माझा विरोध आहे. या विषयावर दिल्ली येथे जाऊन समाजाची बाजू मांडली आहे , म्हणून मी समाजाचा आहे असे मत राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री ना.धर्मराव बाबा यांनी  व्यक्त केले.





















जि प गडचिरोली च्या माजी अध्यक्ष व त्यांच्या कन्या भाग्यश्रीताई आत्राम यांचे 6 ऑक्टोबर वाढ दिवसा निमित्य अभिष्टचिंतन सोहळ्यात क्रीडा संकुल एटापल्ली येथे बोलत होते.





















  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. धर्मराव बाबा आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर भाग्यश्रीताई आत्राम , राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष  ऋतुराज हल्गेकर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, रामेश्वर बाबा आत्राम, लीलाधर भरडकर, जयराज हल्गेकर यांची यावेळेस उपस्थिती होती






















बीरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


















पुढे बोलताना ते म्हणाले की, आरक्षणाच्या विषयावर घाबरण्याचे कारण नाही. अनुसूचित जमाती च्या आरक्षणाला धक्का लावण्याची कुणाची हिम्मत नाही. आम्ही ते सहन करणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने आम्हाला आरक्षण मिळाले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मूलमंत्र घेवून सर्व समाज विरोध करायला सज्ज आहे असे ते म्हणाले.


















ईतर मागास प्रवर्ग च्या आरक्षणाला सुद्धा त्यांनी हात घातता. ज्याचे आहे त्याला मिळाले पाहिजे. दुसरे त्यात समाविष्ट करू नये. त्यांना द्यायचे असल्यास वेगळी व्यवस्था करण्यात यावी. अशी भूमिका त्यांनी यावेळेस मांडली.



















प्रसंगी जरावांडी येथील राजू कोडापे यांनी आपले मत व्यक्त केले.प्रास्ताविक श्रीकांत कोकुलवार यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा किशोर बुरबुरे यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.