राजे आले..लगेच विद्यार्थ्यांची अडचण झाली दूर.. संवेदनशील राजेंना मानाचा मुजरा.

45

आलापल्ली:-भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नुकतेच आलापल्ली येते माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम आले होते, कार्यक्रम झाल्यावर अहेरी परत येतांना आलापल्ली बस स्थानक जवळ अनेक विद्यार्थी बस येण्याची वाट बघत असल्याचे राजेंना लक्षात आले.
राजे साहेबांनी स्वतः गाडी थांबवून विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली, तेंव्हा गेल्या 3 तासापासून थंडीत हे विद्यार्थी बससाठी वाट बघत असल्याचे राजे साहेबांना विद्यार्थ्यांनी सांगितले, आणि संवेदनशील मनाच्या राजे साहेबांनी अहेरी आगाराचे आगार व्यवस्थापक (DM) युवराज राठोड यांना स्वतः फोन लावुन चांगलीच तंबी दिली, विद्यार्थ्यांसाठी बस तात्काळ आलापल्ली साठी सोडण्याची सूचना त्यांना केली, काही वेळातच बस आली आणि राजे साहेबांनी लगेच सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि पाण्याची व्यवस्था करून दिली, सर्व विद्यार्थी बस मद्ये चढत पर्यंत स्वतः तिथे थांबले.. बस रवाना होताच राजे साहेब अहेरीसाठी निघाले.. अशा संवेदनशील आणि दिलदार मनाच्या राजाला खरोखरच मानाचा मुजरा.