एटापल्ली :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात *महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी* यांनी *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील* *शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. त्याच्या निषेधार्थ तालुका काँग्रेसचा वतीने आज बस स्थानक एटापल्ली येथे आंदोलन करण्यात आले.*
तात्काळ महाराष्ट्र राज्यातून राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची हाकलण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.
महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यापूर्वी सुध्दा बेताल वक्तव्य व वादग्रस्त व्यक्तव्य करुन महाराष्ट्रृ राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा काम सातत्याने राज्यपाल कोषारी यांच्याकडून होत आहे. तथापी यापूढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यास म्हणून शिवप्रेमी म्हणून *तालुका काँग्रेस कमिटी एटापल्ली* कडून जसच्या तसं उत्तर देण्यात येईल. भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही. तरी त्यांनी आपला राजीनामा देऊन उत्तराखंडला जाण्याची वेळ आहे.
आज केलेल्या आंदोलनात *तालुका काँग्रेस कमिटी* एटापल्लीचे *तालुकाध्यक्ष* , *श्री रमेश सावकार गंपावार,शहराध्यक्ष* *श्री सतीश मुप्पलवार,तालुकाध्यक्ष(अनु ** . *जाती विभाग)श्री बंटी जुनघरे* , *श्री मनोहर बोरकर,नगरसेवक* *,श्री निजान पेंदाम,नगरसेवक,श्री* *तानाजी दुर्वा, माजी नगरसेवक,* *श्री बालाजी हलामी, माजी सरपंच* , *श्री अनिल तेलकुंटलवार,जेष्ठ* *नेते,श्री लोकेश भाऊ गावडे,* *सुहास पुज्जलवार,संदीप मारगोनवार,देवा सिडाम,* *कृष्णा झरिया,* *उमेश मडावी,रवी पुंगाटी,स्वप्नील गुरलवार,प्रवीण हेडो,श्याम कोन्नम, मोहित सेलोटे,खुशवंत करमरकर समेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.*