भामरागड “:भामरागड तालुक्याच्या दुर्लक्षित विकासधोरणांकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी हर्षवर्धनराव धर्मरावबाबा आत्राम यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपुरातील देवगीरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी हर्षवर्धनराव यांनी भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांपर्यंत विकास पोहोचावा आणि शहराची या भागाचा कनेक्ट व्हावा, याबाबतच्या मागण्यांचे निवेदन दिले. उपमुख्यमंत्र्यांनीही हर्षवर्धनराव यांना खंबीर असे आश्वासन देत, भामरागड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही प्रतिबद्ध असल्याचे सांगीतले. लवकरच भामरागड तालुक्याला भेट देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.