जाफ्राबाद ग्रामपंचायत येथे सरपंच पदाकरिता संध्याराणी आत्राम यांचे उमेदवारी अर्ज दाखल.

47

सिरोंचा: तालुक्यातील जाफ्राबाद येथे आगामी होणाया ग्रामपंचायत
निवडणूकीसाठी बहुजन समाज पार्टी कडुन ग्रामपंचायत जाफ्राबाद च्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तहसील कार्यालय सिरोंचा येथे नामांकन अर्ज दाखल केले आहे. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष गडचिरोली मा. शंकर बोरकुटे  यांचे मार्गदर्शनाखाली व्येंकटी बोरकुटे यांच्या नेतृत्वात  जनतेमधून थेट सरपंच आणि सदस्य पदांसाठी बहुजन समाज पार्टी पॅनलच्या उमेदवारांनी काल तहसील कार्यालय सिरोंचा येते उमेदवारी अर्ज दाखल केले.
जाफ्राबाद ग्रामपंचायत बहुजन समाज पार्टी पॅनलकडुन सरपंच पदासाठी उच्चशिक्षित एम. ए.  असलेले संध्याराणी आञाम यांच्यासह ग्रामपंचायतीत सर्व सदस्य पदासाठी बिएसपी पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी  मा. शंकर बोरकुटे बिएसपी जिल्हाध्यक्ष गडचिरोली , रामचंद्र सडमेक माजी सभापती पंचायत समीति सिरोंचा , नरेश आञाम जाफ्राबाद चे माजी सरपंच , व्येकटी बोरकुटे , किष्टाया निष्टुरी , सामया आञाम , सुनिता आञाम , सपना दुर्गम ,  सह ह्या तिन्ही गावातील बिएसपी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती….