काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी तालुका तर्फे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी, दंत चिकित्सा व रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पाडन्यात आले

57

वाढदिवसानिमित्त रुग्णसेवा करण्याचा ध्यास घेऊन आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये शेकडो गरिबांना मोफत आरोग्य तपासणी व दंत चिकित्सेचा लाभ मिळत आहे. लोकहिताचा हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विजय भाऊ वडेट्टीवार यांनी आभार मानले. 
विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन व स्फूर्तीने असेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा निश्चय तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.