माजी जि.प. सदस्य सुगाबाई आत्राम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

110

आज दिनांक २९/१२/२०२२ रोज गुरुवारला चामोर्शी तालुक्यातील माजी जि.प. सदस्या सुगाबाई आत्राम, ग्रा.पं. वरुर चे सदस्य राजु मांडवगडे तसेच तरुण आत्राम यांनी  जिल्ह्याचे नेते मा. धर्मराव बाबा आत्राम माजी राज्यमंत्री आमदार, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम हलगेकर, युवानेते रुतुराज हलगेकर, राकाँ. जिल्हाघ्यक्ष रविंद्र वासेकर,  डॉ तामदेव दुधबळे, ता.अध्यक्ष निशांत नैताम, शहर अध्यक्ष ॲड. डींपल उंदीरवाडे , नगरसेवक लौकीक भिवापूरे यांचे मार्गदर्शनात  प्रवेश केला.
यावेळी पक्षाचा दुप्पटा  टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी पक्षात प्रवेश घेतला. यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, कपील बागडे, संजय शिंगाडे, नंदा तिम्मा महीला ता. अध्यक्ष चामोर्शी, शहराध्यक्ष ॲड डींपल उंदीरवाडे, मारोती झाडे, अनिल नरोटे, प्रशांत परमाणीक इत्यादी उपस्थित होते.