शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी केला मेट्रोचा प्रवास

90

अशोक  आईंचवार 
 शहर प्रतिनिधीअहेरी 
छल्लेवाडा: अहेरी तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा, केंद्र-राजाराम येथील पालकांचे संमत्तीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल 26 व 27 डिसेंबरला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने नागपूर येथे पोहचली. सदर प्रवासाची सुरुवात हिरवी झेंडी दाखवून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत सभावट,अनिता शेंडे,गोपाल धरावत,बुज्जीताई तोर्रेम ग्रामपंचायत सदस्या,महेश पुल्लुरी,गणपती लावडे,आदी पालकांनी करून दिली. प्रवासातील उत्तम नियोजनामुळे डॉ.एपिजे अब्दुल कलाम उद्यान चंद्रपूर येथे दुपारी जेवन व विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.त्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला. सायंकाळी पाच वाजता नागपूर येथे पोहचताच दिक्षाभुमीचे दर्शन घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. त्यानंतर कामठी येथील ड्रॉगन पॅलेश येथे गौतम बुद्ध यांचे दर्शन घेतले. लगेच रात्रीचा मुक्काम सार्वजनिक सभागृह नागपूर येथे करण्यात आला. सकाळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी आग्याराम देवी मंदिराचे दर्शन घेतले.त्यानंतर विद्यार्थी रमन विज्ञान केंद्र येथे पोहचले व तेथील बागेतील साहित्याशी तल्लिन झाले.तेथील तारांगण,ग्रह माहिती,थ्रीडी सो, यांबद्दल सर्व माहिती जाणून घेवून माहिती नोट केली. लगेच विद्यार्थी मेट्रो स्टेशन वर पोहचले. कांग्रेस नगर ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन प्रवास केला.प्रवासादरम्याण विमानतळ व शहराचे विहंगम दृश्य पाहिले.तेथील कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. लगेच विमानतळ पोहचून माहिती जाणून घेतली व परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली.सायंकाळी अमन भोजनालय येथे शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वतः स्वयंपाक केला. लगेच रात्रीचा प्रवास सुरू झाला. पहाटे विद्यार्थी छल्लेवाडा येथे पोहचले. बसचे चालक चंद्रकांत भोयर यांनी सुरक्षित प्रवास घडवून अतिशय मोलाचे योगदान दिले. सर्व शिक्षक व विद्यार्थी आपुलकी व मित्रत्वाने राहिले माहिती जाणून घेतली. 
   पालकांनी समाधान व्यक्त करत शिक्षकांचे गुणगान गात आहेत.विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत. यात यशस्वीतेसाठी उत्तम नियोजन कल्पना रागिवार मुख्याध्यापिका तसेच मार्गदर्शक व सहल प्रमुख सुरजलाल येलमुले व बाबुराव कोडापे,गोपाल धरावत,मंजुळा ईमडीवार हे सहभागी होते.