*बाबा जुमदेवजी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – आमदार कृष्णा गजबे*
*दिनाक. 03 जानेवारी 2022*
*कोरची:*
*गरीब व अज्ञानी मानवास भगवान प्राप्तीचा निष्काम भावनेने परिचय करून देऊन सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे व वाईट व्यसन दारू सट्टा, जुगार, लॉटरी, पटाची होळ, कोंबड बाजारातील काती, अंधश्रद्धा हुंडाबळी यापासून मुक्त करणारे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या शिकवणीप्रमाणे जनजागृती करण्यासाठी कोरची येथे दिनांक 03 जानेवारी 2022 रोजी आयोजित मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन व सामूहिक एकतेचे हवन कार्य कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.*
*याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे म्हणाले महान त्यागी बाबा जुमदेव यांचे कार्य अलौकिक आहे मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.*
*या कार्यक्रमाप्रसंगी तुकारामजी भेंडारकर, राजु मदनकर, नशरूभाई भामाणी तालुकाअध्यक्ष कोरची, प्रा. देवरावजी गजभिये, आनंद चौबे, मनोहर देशमुख, मोरेश्वर गबने, बालाजी नंदनकर, वासुदेव पडोळे, फकीरा झिपकाटे, संजय महाकाळकर, प्रवीण उराडे, विठ्ठलराव शिरसागर, हर्षलताई भैसारे, हिरा राऊत, मनोज अग्रवाल, डॉक्टर शैलेंद्र बिसेन, कमलनारायण खंडेलवाल, नीताताई किलनाके, गोविंद दरवडे, राहुल अंबादे, नंदकिशोर वैरागडे, मधुकर नखाते, राष्ट्रपाल नखाते, देवाजी मोहूर्ले आदि उपस्थित होते.*
*परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोरची, कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, ब्रह्मपुरी, सलग्न छत्तीसगढ परिसरातील सेवकांच्या सहकार्याने मानवधर्माचे सेवक संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले