देवरी येथे होणार विभागीय क्रीडा स्पर्धा
मुलचेरा: नुकतेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत मुलचेरा येथील विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले. त्या विद्यार्थी खेळाडूंची भेट घेऊन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी त्यांना पुढील विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी तर्फे शासकीय आश्रम शाळा पेरमीली येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत खमनचेरु केंद्राने विजेतेपद तर मुलचेरा केंद्राने उप विजेतेपद पटकाविले.चार केंद्रातील जवळपास 687 विद्यार्थी खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.त्यापैकी विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी 330 विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविलेले आहे.त्यात मुलचेरा केंद्रातील बरेच विद्यार्थ्यांचा समावेश असून पुढे देवरी येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेत हे विद्यार्थी क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत.
नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम मुलचेरा तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असता त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.