केळी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करपा (सिगाटोका) रोगाचे नियंत्रण आवश्यक– नरेंद्र राठोड तालुका कृषी अधिकारी

47

तेल्हारा: हिंगनी बु. येथील प्रगतशील शेतकरी सचिन कोरडे पाटील यांच्या शेतात अकोला येथील तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी केळी पिक पाहणी करता भेट दिली असता केळी पिकावर येणाऱ्या करपा या रोगाबद्दल चिंता व्यक्त करून या रोगाबद्दल  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.केळी पिकावर करपा रोग येणे याचे लक्षणे म्हणजे खालील पानांवर सुरवातीला लक्षणे दिसतात. पानांवर लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके कालांतराने ते मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. ठिपक्‍याभोवती पिवळ्या रंगाचे वण दिसतात. झाडावर कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. त्यामुळे घडांचे पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी घडावरील फळे आकाराने लहान राहतात. फळातील गर अकाली पिकतो. रोगास अनुकूल बाबी- रोगग्रस्त बागेतील कंदांचा वापर.
शिफारशीत बेणेप्रक्रियेचा अभाव.
पीक फेरपालटीचा अभाव. शिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड.पावसाच्या पाण्याचा अयोग्य निचरा.बागेमध्ये व सभोवताली सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव.
 नियंत्रण-हा रोग एकात्मिक रोग नियंत्रण तंत्राच्या अवलंबनाने नियंत्रित होऊ शकतो. मशागतीत योग्य फेरपालट, रोगग्रस्त पानाचा नाश व योग्य बुरशीनाशकाचा वापर केल्याने रोगाचे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते. मशागत-केळीची लागवढ ओढे, नदी नाले यांच्या काठावरील शेतात आणि चिबड जमिनीत करु नये.केळीची लागवड शक्यतो मे महिन्याच्या शेवट चा आठवडा किंवा जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाढयातच करावी असे प्रतिपादन व मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.यावेळी गावातील शेतकरी यांची उपस्थिती होती.