टरबूज लागवडीस सुरुवात. शेतकऱ्यांनी टरबुज पिकाची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत करावी. नरेंद्र राठोड,तालुका कृषी अधिकारी

70

तेल्हारा:तालुक्यात  कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात.   दोन्ही पिके उन्हाळी हंगामात  बागायती पीक म्हणून घेतले जातात. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुघंध असतो. या फळामध्ये चुना , फॉस्फरस ही खनिजे व अ ,ब ,क  जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. तेल्हारा तालुक्यातील हिंगणी,दानापूर, गॉर्धा ,परिसरात टरबुजाच्या पिकाला शेतकऱ्यांची चांगली पसंती दिसून येत आहे. हिंगणी बू.येथील शेतकरी सचिन कोरडे यांचे शेतात टरबूज पीक लागवड होत असताना तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड ,कृषी सहायक महेश इंगळे यांनी भेट देवून  टरबूज व खरबूज पिकाचे व्यवस्थापन, या बाबतीत  उपस्थित  शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड यांनी सांगितले की,कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड,पाणी व्यवस्थापन, किड नियंत्रण, अशा अनेक बाबींवर सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. तणनियंत्रण करिता शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर करावा अशी माहिती  कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी शेतकऱ्यांना दिली.