एटापल्ली:- कॉलेज सुटल्यावर
नेहमीप्रमाणे आपल्या घरी परत असताना दुचाकीच्या धडकेत जीवनगट्टा येथील सानिया डोंगरे हिचा 12 जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. याची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी थेट जीवनगट्टा गाठून डोंगरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
सानिया डोंगरे राजमाता राजकुवर कन्या विद्यालय,एटापल्लीची विद्यार्थिनी होती. कॉलेज सुटल्यावर ती काल दुपारच्या सुमारास अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या जीवनगट्टा या गावी पायी जात असताना दुचाकी चालक पेका गुंडरू याने जबर धडक दिली.यात सानिया डोंगरे हिला गंभीर मार लागून तिचा जागीच मृत्यू झाला.
सानिया ही हुशार आणि होतकरू मुलगी होती. तिच्या अपघाती मृत्यूने एटापल्ली परिसरात शोककळा पसरला आहे. घडलेली घटना समाज मनाला चटका लावणारी आहे.या दुःखद घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी संजय डोंगरे यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन केले.