स्वामी विवेकानंद यांनी सम्पूर्ण जगातील युवकांना दिली प्रेरणा: माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम

46

शांतिग्राम येथे कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न.

स्वामी विवेकानंद यांनी सम्पूर्ण जगातील युवकांना  दिली प्रेरणा
माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम
मूलचेरा:-
स्थानिक मूलचेरा तालुक्यातील शांतिग्राम येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ, शांतिग्राम यांच्या माध्यमातून रोज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून कब्बडी स्पर्धेचं आयोजन शांतिग्राम येथील ग्रामपंचायत पटांगणात  करण्यात आले होते, त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,त्यावेळी ते म्हणाले स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगातील युवकांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे युवा वर्गाला चांगला रस्ता दाखवण्याचं काम त्यानी केलं आहे,आजच्या युवा पिढीने त्याच्या पुस्तकाचं वाचन करावे त्यांचे विचार आत्मसात करावे आणि त्याचं पालन करत आपली प्रगती करावी,आज विश्व युवा दिवस म्हणून साजरा केला जातो, तसेच कब्बडी या खेळाने युवा  स्वतःची प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव उंचावर नेऊ शकतो,मी आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला प्रत्येक खेळासाठी प्रोत्साहन देत असतो,युवा वर्गासाठी आणि त्यांना मी सहकार्य करत असतो युवा वर्गाने सामाजिक कार्यात सदैव समोर यावं मी आपल्या सोबत आहो माझ्या कडून मी सर्वोतोपरी सहकार्य करत राहीन असे मत त्यांनी या वेळी दिले,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवा निवृत्त मुख्याध्यापक मंडल सर तर प्रमुख पाहुणे म्हणून काजी सर,, वलंके सर, सागर मडावी, वैष्णव ठाकूर,गणेश गारघाटे, किशोर मल्लिक,घरामी,सुसेन बिश्वास,निपुण शील हे होते,
आज कार्यक्रमात सेवा निवृत्त शिक्षक ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,यांचा सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला आणि सोबतच लगाम, शांतिग्राम, तुमुरगुंडा, चुटुतुंता येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले, आजच्या कार्यक्रमाचं आयोजन स्वामी विवेकानंद सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ चे अध्यक्ष महेश तरफदार,हिरनमय बिश्वास, सौ.सोनिया मंडल,सुजाता रॉय,कल्पना मंडल,सुशांत रॉय, मृणाल बेपारी,विनोद घरामी,
सुशील हलदार यांनी केलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी,शालेय विद्यार्थी उपस्थित होते.