सुकन्या विद्यालय काटी मध्ये विद्यार्थी यांना 74 सायकल चा वाटप.

66

गोंदिया- स्थानिक सुकन्या संकल्पनिकेतन हिंदी हायस्कूल व कॉलेज काटी. शालेय विद्याथी यांनी मानव विकास संसाधन तर्फे 74 सायकल वाटप करण्यात आले.या सायकल वाटप कार्यक्रमास गोंदिया जिल्हा परिषद चे  सदस्या कु.नंदाताई वाडीवा, पंचायत समिती सदस्या कु.जितेश्वरीताई रहांगडाले, शाळेच्या शिक्षक व पालक संघाचे अध्यक्ष मधुजी अंबुले, प्रमुख पाहुणे म्हणून मिताराम पाटील उपस्थित होते. गावचे ज्येष्ठ समाजसेवक भोयर उपस्थित होते. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संचालक गजेंद्रजी फुंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जीवनातील आत्मनियंत्रण व शिस्तीचे महत्त्व सांगितले. यानंतर प्रमुख पाहुणे व शाळेचे संचालक श्री.फुंडे यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक बहेकर सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.