#Rajaramखेळांप्रमाणे सर्वच क्षेत्रात युवकांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा -अम्ब्रिशराव आत्राम.

45

खांदला येथे राज्याचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन











खेळांप्रमाणे सर्वच क्षेत्रात युवकांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा ! -राजे अम्ब्रिशराव आत्राम.

राजाराम-खांदला येथे व्हाॅलीबाॅल टुर्मामेंटचे ऊघ्दाटन माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते झाले.प्रसंगी बोलतांना अहेरी ऊपविभागात पुर्वी मोजक्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या परंतू आता सर्वच खेळांचे टूर्नामेंट होत असतांना दिसत आहेत ते सुध्दा सर्वच दुर्गम भागात सुरु आहेत ही आनंदाची बाब आहे.

आपल्या भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असल्याने असे टूर्नामेंट झाल्यास खेळाडूंना पोषक वातावरण मिळेल असे प्रतीपादन केले.

पुढे बोलतांना क्रिडा ही मानवी जिवनात आवश्यक बाब असते अशा स्पर्धांचे आयोजन करतांना गावकर्‍यांची एकजूटसुध्दा दिसते.सुशिक्षीत युवकांनी खेळांप्रमाणे गावाच्या विकासासाठी सुध्दा एकजुटीने पुढाकार घेतल्यास गावाचा नक्कीच सर्वांगीन विकास होऊ शकतो असे ते बोलले.

यावेळेस कार्यक्रमाला युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, सौ. सुमनताई आलाम सरपंचा ग्रामपंचायत खांदला,रवणी गावडे सदस्या,

 रविभाऊ नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी,संतोष मद्दीवार भाजपा महामंत्री,पोशालू सुदरी भाजपा महामंत्री,मुलचंद गावडे, सुरेश मोतकुरवार,केवल गड्डमवार रविंद्र पजालवार मनोज सिडाम ऊपस्थित होते.