अहेरी तालुक्यातील वेलगुर टोल्याच्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काल दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले होते, मराठवाडा येतील नांदेड आणि परभणी येतील सदर २ युवक चार महिन्यापूर्वीच कमलापूर पोस्ट ऑफिस मद्ये पोस्ट मास्टर आणि पोस्टमन मनुन रुजू झाले होते, ते २ दिवसीय प्रशिक्षण घेण्यासाठी दुचाकीने गडचिरोली येते मूलचेरा मार्गाने जात असतांनाच हा दुर्दैवी अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
ह्या २ युवकांचे मृतदेह स्वगावी नांदेड आणि परभणी नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना पैशांची गरज आहे हे माहीत झाल्यावर गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी २५,०००/- पंचवीस हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत केली, तसेच ह्या दुःखद प्रसंगी त्यांचा कुटूंबियांचे सांत्वन करीत, मृतदेह मराठवाडा नेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना ह्यावेळी दिले..