# Bhagyadhree Taiविज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ:भाग्यश्रीताई आत्राम

45

सिरोंचा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न









सिरोंचा:- विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देश पातळीवर सिरोंचा तालुक्याचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

सिरोंचा तालुक्यातील मॉडेल स्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, गटविकास अधिकारी विकास घोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद कुमार पांचाळ,केंद्रप्रमुख रच्चावार,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी,माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार तसेच सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केली.तर तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयोग सादर करण्याचे आवाहन केले.

विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक तथा माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मॉडेल तयार केले होते.मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रत्येक मॉडेलची पाहणी केली. यावेळी विज्ञानप्रेमी शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.