#Brahmapuri आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर निलज येथे संपन्न

58

ब्रम्हपुरी:  तालुक्यातील निलज येथे 11 फेब्रुवारीला ग्रामपंचायत च्या वतीने  तथा अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होम आरमोरीच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
      निलज येथील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतच्या वतीने गावातच नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी व रोगावर उपचार व्हावा तसेच गावातील आजाराविषयी माहिती मिळावी याकरिता आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन  जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते . 
शिबिराचे  उद्घाटन अनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होम आरमोरीच्या महिला रोग तज्ञ डॉ. शिलू चिमुरकर  यांच्या हस्ते पार पडले.तर द्वीप प्रज्वलन आरमोरी येथील प्रसिद्ध डॉ. महेश कोपुलवार यांनी केले. यावेळी अध्यक्ष म्हणून अण्णाजी ठाकरे बाबुसाहेब रुई प्रमुख अतिथी म्हणून निलजचे सरपंच हेमंत ठाकरे, उपसरपंच शंकर कोपुलवार, ग्रामसेवक तलमले, अशोक भुते, देवराव भुते, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद नखाते पत्रकार राहुल मैंद, नोजराज घुगुसकर, राजीराम भर्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार विनोद चौधरी यांनी केले
 तर आभार सरपंच हेमंत ठाकरे यांनी मानले.निलज येथील दिडशेहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुसया मॅटर्निटी   व नर्सिंग होमचे पॅथॉलॉजिस्ट राधे सरकार, प्रीती गोंनाडे, निशा भोयर, ग्रामपंचायत सदस्य नारायण मेश्राम, मनोहर रहाटे, शीला सौंदरकर, प्रिया ढोरे, अरविंद मांढरे, डाकराम पिलारे, साहिल ढोरे व समस्त गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.