पुरवठा निरीक्षक बोरकर यांचे तत्काळ स्थानांतरण करुन विभागीय चौकशी करण्यात यावी… देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कन्हाडे यांची मुख्य सचिवांकडे तक्रार..

93

पुरवठा निरीक्षक बोरकर यांचे तत्काळ स्थानांतरण करुन विभागीय चौकशी करण्यात यावी गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तहसील कार्यालयात कार्यरत पुरवठा निरीक्षक युवराज बोरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सिएमआर मिलींग प्रकरणात प्रचंड गैरव्यवहार करून शासनाची दिशाभूल करून व फसवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याने बोरकर यांचे तत्काळ जिल्हाबाहेर स्थानांतरण करुन कायदेशीर कारवाई करणेत्सव विभागीय चौकशी करण्याची मागणी देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कन्हाडे यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांचेकडे केलेल्या तक्रारी तुन केली असल्याने संबंधित विभागात एकच खळबळ माजली आहे. कन्हाडे यांनी मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की शासकीय धान्य गोदाम गडचिरोली येथे छाया कुंभारे यांनी आपल्या कार्यकत्यींसह धाड टाकून पुरवठा करण्यात आलेल्या तांदळाची चौकशी केली असता ट्रक क्रमांक एमएच ४० वाय १३७२ व ट्रक क्रमांक एमएच-३३ क्यु-००४५ या वाहनांद्वारे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सिएमआर बेसगोदाम आरमोरी येथुन निकृष्ठ दर्जाचा तांदुळ पुरवठा केल्या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी बोरकर यांना दोषी ठरवून ५७हजार ४१० रुपयाचा दंड ठोठावला होता. त्या अनुषंगाने तत्कालीन विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अनुसार क्र.४८२ अंतर्गत सन २०२२ चे प्रथम (अर्थसंकल्प) अधिवेशनात लक्षवेधी सुचना लावून सदर गंभीर प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून उक्त प्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच २५ मार्च २०२२ रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेत्या यांनी देखील गडचिरोली येथील शासकीय धान्य गोदामात पकडण्यात आलेला तांदुळ निकृष्ठ दर्जीचा, प्रमाणापेक्षा जास्त कणी असलेला व धुळीने माखलेला, मानवी खाण्यास अयोग्य असलेला असल्याचे प्राप्त जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी दिलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाल्याने संबंधित मिल मालक, पुरवठा खात्याचे अधिकारी व आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या संगनमताने सरकारची कोट्यावधी रुपयाने फसवणूक करण्यात आल्याने संबंधितांवर तातडीने कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी गडचिरोली यांना मागविला होता. दरम्यान वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस यांचेकडे जेसामल मोटवाणी यांचे निवेदन व विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने आरमोरीच्या शासकीय गोदामातुन हिंगणघाट येथे निकृष्ठ दजीच्या तांदळाचा पुरवठा होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, करीता प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता हिंगणघाट येथे पुरवठा करणाऱ्या राईसमिलर्स व शासकीय गोदामाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत उचित कारवाई करण्यासंदर्भात ३० जुलै २०२२ च्या पत्रान्वये निर्देशित केले होते. उपरोक्त वरील प्रकरणांमुळे बोरकर यांची तत्कालीन पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथुन गोदाम व्यवस्थापक, शासकीय गोदाम तहसील कार्यालय जिवती, जिल्हा-चंद्रपुर येथे बदली करण्यात आली होती. मात्र बोरकर यांनी संबंधित राईसमिलर्सना सिएमआर मिलींगमध्ये लाभपोहचवण्याच्या उद्देशाने गडचि रोलीतील राईसमिलर्सना हाताशी धरून संगनमताने शासनाची दिशाभूल करून खोटे कौटुंबिक व वैद्यकीय कारण दाखवून पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय कोरची, जिल्हा गडचिरोली येथे पदस्थापना करवून घेतली. दरम्यान आरमोरी येथे पुरवठा निरीक्षक पद रिक्त नसतांना व ते कोरची येथे बदली होण्यापुर्वी आरमोरी येथेच कार्यरत असतांना बोरकर यांना आरमोरी येथे परत सिएमआर तांदुळ पडताळणीच्याच कामासाठी आणण्यात आल्याचे एकंदरीत आरमोरी तालुका सरपंच संघटनेने तालुक्यातील रेशन दुकानांत मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ पकडून संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे ४ सप्टेंबर २०२३ रोजी केली होती. यावरून बोरकर हे संगनमताने शासनाची फसवणूक करून गोरगरीबांच्या माथी निकृष्ठ दर्जाचा तांदुळ मारीत असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांचे गडचिरोली जिल्ह्यातुन तत्काळ स्थानांतरण करुन कायदेशीर विभागीय कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.