सामूहिक विवाह सोहळ्यात जेवन वाढले , आणि सर्वांसोबत मिळून स्नेहभोजनही केले.
रविवार:26 फेबुवारी रोजी अहेरी तालुक्यातील व्येंकटापुर येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी महा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
खरे तर शेकडोच्या वर जोड़पे आणि हजारोंच्या संख्येने वराती होते, अक्षदा आटोपताच लग्नातील वरहाड़ी यांची ग़ैरसोयी होऊ नये अशी दक्षता बाळगुन स्वतः आयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम व युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी वर-वधु व प्रामुख्याने वरहाड मंडळीना जेवन वाढले.
लग्न सराईत पाहुन्यांची जसे विचारपूस करतो अगदी तसेच आस्थेने विचारपूस करून जेवनासाठी आग्रह धरून होते, साऱ्यांचे जेवन आटोपल्या नंतर आयोजक या नात्याने सरतेशेवटी तेही कार्यकर्ते व परिश्रम घेतलेल्यांसोबत स्नेहभोजन केले.,खरे तर स्पेशल जेवन वेगळीकड़े अरेंज करू शकले असते पण तसे न करता सर्व सामान्यासोबतच गप्पा करीत जेवन केल्याने अनेकांनी असे नेते मिळणे दुरापास्त अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केले.