प्रतिनिधी पेंढरीः प्रशांत पेदापल्लीवार
मोहगाव ग्रामसभेनी 2 वर्षापूर्वी गोंडी भाषेतून (स्थानीक भाषा) सुरु केलेल्या शाळेचे कौतूक करण्यासाठी प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री, श्रीमती शोभाताई फडणविस मोहेगाव येथे भेट दिली, छत्तीसगड सिमेलगत व अति दुर्गम भागाला भेट दिली असता ,मी या परिसरात १० वर्षापूर्वीच का नाही पोहेचली अशी खंत व्यक्त केली,
आपली बोलीभाषा व संस्कृती अबाधित राहावी या करिता मोहगाव ग्रामसभेनी गोंडी, इंग्रजी, हिन्दी, मराठी या सर्व भाषेतून शिक्षण देत आहे, परंतू सन २०२२ मध्ये शिक्षण विभागाकडुन सदर शाळा अनधिकृत ठरविण्यात आली व १लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे हयाविरोधात मोहगाव ग्रामसभा शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल केलेली आहे
या व इतर सर्व समस्या जानून घेण्यासाठी प्रत्यक्षात शोभाताई फडणविस यांनी मोहगाव ग्रामसभेला भेट दिली. त्या बोलतांना परिसरातील सर्व समस्यावर चर्चा केली – सदर कार्यक्रमाला श्रीनिवासभाऊ दुल्लमवार माजी जिल्हा परिषद सदस्य, पवन येरमे सरपंच ग्रामपंचायत पेंढरी निरजभाऊ पटेल गडचिरोली अनिल संतोषवार ,सौरभ केदार अविनाश जगताप, महेंद्र करकाळे देवसाय आतला’, बावसु पावे मोहगाव, तुमसरे साहेब जिल्हा कृषी अधिकारी ,जि प गडचिरोली पाल साहेब तालुका कृषी अधिकारी, दिनेश पानसे कृषी विभाग सावली, गावडे इलाखा प्रमुख व इतर ग्रामस्थ होते
या चर्चासत्रात मुख्य मुद्यावर चर्चा करण्यात आली त्यात गोंडी शाळेला मान्यता देणे व शेतकऱ्यांच्या धान्य विक्रीसाठी मर्यादा वाढवून देणे व जि. प. अंतर्गत रस्त्याचे व पुलीयाचे बांधकाम करणे, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देने
या सर्व समश्यावर ताईंनी भाषणातून आवर्जून उलेख करत गोंडी शाळेला शासन मान्यता देण्यासाठी लवकरच मा. उपमुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार व शेतकराच्या धान्य विक्रीची मर्यादा वाढवून देण्याबाबत
आदिवासी आयुक्तांशी बोलून लगेचच पत्र काढण्यात येईल अशी हमी दिली, रस्ते व पूलीया बाबत जिल्हा परिषद शी संपर्क करून माजी जी प सदयस्य व परिसरातील सरपंच ह्यांना सोबत घेऊन सर्व विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले व यानंतर पेंढरी परिसरातील समस्या बाबत वेळोवेळी माझ्याशी संपर्क करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री माणिक हिचामी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री जयंत मेश्राम ग्रामविकास अधिकारी यांनी मानले







