# Mumbai#अखेर धान खरेदीची मर्यादा व मुदत वाढवली

53

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नांना यश

वाढीव खरेदी उद्दिष्ट ५ लाख ४२ हजार ५०० क्विंटल तर खरेदीची मुदत ८ मार्च २०२३ पर्यंत वाढविली







केंद्र व राज्य सरकारचे मानले आभार

१ मार्च पासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश*

दिनांक २८/२/२०२३ मुंबई







*आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या धान खरेदीचे वाढीव उद्दिष्ट  ५ लाख ४२ हजार ५०० क्विंटल पर्यंत करण्यात आले असून धान खरेदीची मुदत ८ मार्च २०२३ पर्यंत  धान खरेदला मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे  जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार







 असून आमदार डॉक्टर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या  पत्रव्यवहार व पाठपुरावा या प्रयत्नांना  मिळालेले हे यश आहे.








*या  निर्णयाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी स्वागत केले असून केंद्र सरकार व राज्य सरकारचे आभार मानले आहे.








*आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी अन्न व नागरी पुरवठा संरक्षण विभाग मंत्रालयाच्या वतीने यासंदर्भात महाव्यवस्थापक नाशिक यांना  निर्देश दिले असून सर्व जिल्ह्यातील व्यवस्थापकांना तातडीने धान खरेदी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे दिनांक १ मार्चपासून याची अंमलबजावणी होणार असून









 शेतकऱ्यांनी आपल्या धानाची विक्री आपल्या नियोजित केंद्रावर करावी  असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.