भगवंतराव महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती दिन साजरी

66

आज दिनांक २४/०९/२०२५ रोजी एटापल्ली येथील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती(अंत्योदय दिन) साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन बुटे हे होते. तर प्रमूख अतिथी म्हणून प्रा. डाॅ सुधीर भगत,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ संदिप मैंद, प्रा. डाॅ विश्वनाथ दरेकार, प्रा. डाॅ निलेश दुर्गे हे होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डाॅ. संदिप मैंद यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. चिन्ना पुंगाटी आणि प्रा यांनी केले.
प्राचार्य डॉ. एस. एन बुटे आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की, ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि उत्कृष्ट संघटक होते.यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले ‘एकात्म मानववाद’ हे तत्त्वज्ञान.​हा विचार भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन्ही पाश्चात्त्य विचारांना पर्याय म्हणून भारतीय संस्कृतीच्या आधारावर मांडला गेला.​एकात्म मानववाद व्यक्तीच्या शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही अंगांचा आणि निसर्ग, समाज व विश्वाचा एकत्रित विचार करतो.त्यांनी ‘अंत्योदय’ या संकल्पनेवर विशेष भर दिला, ज्याचा अर्थ समाजातील सर्वात गरीब आणि शेवटच्या व्यक्तीचा उत्कर्ष करणे हा आहे.
या कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाव्दारे महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन बुटे हे होते. तर प्रमूख अतिथी म्हणून प्रा. डाॅ सुधीर भगत,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ संदिप मैंद,प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार प्रा. डाॅ विश्वनाथ दरेकार, प्रा. डाॅ. शरदकुमार पाटील, प्रा. डाॅ निलेश दुर्गे, प्रा. डाॅ. राजीव डांगे प्रा. डाॅ. श्रृती गुब्बावार, प्रा. राहुल ढबाले, प्रा. अतुल बारसागडे, प्रा. स्वाती तंतरपाळे हे होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डाॅ. संदिप मैंद यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. चिन्ना पुंगाटी आणि यांनी केले.