खांदला (ता. अहेरी) येथील रहिवासी श्री. शिवराम गोसाई बावनकर यांच्यावर वाघाने हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले.
या प्रकरणी भाग्यश्री ताई आत्राम यांनी दूरध्वनीद्वारे मा. उपवनरक्षक साहेब, सिरोचा यांच्याशी संपर्क साधून तत्काळ मदतीची व्यवस्था केली. परिणामी, ₹20,000/- ची तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयात खांदला येथील नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) चे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. शिवराम गोसाई बावनकर यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.