भगवंतराव महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न

78

*एटापल्ली* : भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.एस. एन. बुटे होते, तर प्रमुख मार्गदर्शक मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र), प्राचार्य डॉ. डी.जी. म्हशाखेत्री (प्राचार्य प्रवर्तक, करिअर कट्टा गडचिरोली जिल्हा) तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर डॉ. कुंदन दुपारे (जिल्हा समन्वयक, करियर कट्टा गडचिरोली जिल्हा), प्रा. डॉ.निलेश दुर्गे ( समन्वयक, करियर कट्टा भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली), प्रा.अतुल बारसागडे (सहसमन्वयक, करियर कट्टा), डॉ. बि.डी. कोंगरे, डॉ. संदीप मैंद, डॉ. विनोद पत्तीवार, डॉ. एस.पी. पाटील (तालुका समन्वयक, करियर कट्टा), प्रा.चिन्ना पुंगाटी, डॉ. श्रुती गुब्बावार, प्रा. भारत सोनकांबळे, डॉ. स्वाती तंतरपाळे इत्यादी उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची गुरुकिल्ली स्वतः हुन शोधावी आणि येणाऱ्या काळात स्वतः स्वदेशी आणि परकीय गुंतवणूक करावी जेणेकरून आपल्या आयुष्यातील समस्या दुर होण्यास मदत होईल. आपण उद्योजक कसे बनू शकतो, त्या उद्योगातून आत्मनिर्भरता व त्याच बरोबर मागासवर्गीय लोकांना त्या उद्योगातून काय लाभ देऊ शकतो आणि आपल्या आयुष्यात आपल्याला पोटाची समस्या कसं सोडवू शकतो. या सर्व काही प्रश्नांची उत्तरे आहे. ते आपण करियर कट्टा ॲप्स मधील रोज मिळणाऱ्या मार्गदर्शनाद्वारे सोडवू शकतो.” अश्या प्रकारे प्रमुख मार्गदर्शक मा. यशवंत शितोळे यांनी मत मांडले. तसेच विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे यांनी सुद्धा अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना करियर विषय मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल ढबाले तर प्रास्ताविक प्रा.डॉ. निलेश दुर्गे आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर यांनी केले. या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.