माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आरोग्य विभागाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलनाला दिली भेट

444

*अहेरी:-* राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य केंन्द्र समोर अहेरी येथे सुरू असलेल्या बेमुद्दत कामबंद आंदोलन स्थळी भेट देवून आंदोलनाच्या मागण्या जाणून घेतल्या.महाराष्ट्र शासनाच्या दि. १४/०३/२०२४ रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजनाची प्रक्रिया शासनाने थांबवून ठेवलेली असून ती त्वरित पार पाडावी व ज्यांना 10 वर्षे झालेली नाही अशांना बदली धोरण, वेतनवाढ, ईपीएफ, आरोग्य व अपघात विमा आदी लागू करण्याच्या मागणीसाठी “बेमुदत कामबंद” आंदोलन सुरू केले आहे.त्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा करण्यात आली व आपल्या मागण्या रास्त असल्याचे सांगुन शासनापर्यंत पोहचवून त्वरीत मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करू असे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सांगीतले.

सदर भेटीदरम्यान युवा नेते मा.कुमार अवधेशरावबाबा आत्राम,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार,भाजपा तालुका अध्यक्ष विकास तोडसाम व कार्यकर्ते उपस्थित होते.!