गडचिरोल्ली;-आदरणीय सर
जयहिंद
दिनांक 08/03/2023 रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खां येथे मा. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री यतीन देशमुख सर यांच्या संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली “
*भव्य महिला* ” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर भव्य मेळाव्यामध्ये अध्यक्षा म्हणून मा. Adv रुपाली गेडाम मॅडम राजाराम खां हजर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ मनोज येलमुले वैद्यकीय अधिकारी कमलापूर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ आलाम मॅडम प्रतिष्ठीत नागरिक राजाराम , श्री पूजलवार सर मुख्याध्यापक जी प शाळा मरनेली, , राऊत सर शिक्षक राजाराम,मडावी साहेब पोलीस उपनिरीक्षक एस आर पी एफ हिंगोली, व आम्ही पोउपनि कसबेवाड प्रभारी अधिकारी , पो उप नि जाधव सा, सर्व जिल्हा पोलीस ,एस आर पी एफ चे अधिकारी आमलदर ,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व हद्दीतील 100ते150 नागरिक व 100 विद्यार्थी उपस्थित होते.
Adv रुपाली गेडाम मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले
उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व महिलांना घमेले व साड्या देऊन शासनाच्या विविध योजना विषयी वेगवेगळी माहिती दिली व जेवण देऊन मिळावी सांगता करण्यात आली