प्रतिनिधी//रूपेश सलामे
:- दि.०५.०८.२०२५ रोजी मा .श्रीमती. अपर्णा गित्ते मॅडम,कार्यकारी संचालक (सु व अं) मुंबई यांच्यासोबत महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपनी मर्या. सुरक्षा व दक्षता विभाग अधिकारी संघटना (असंलग्न) महाराष्ट्र राज्य. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली बैठकीत आपल्या विभागाशी संबंधित महत्वाच्या विषयावर विस्तृत व अत्यंत सकारात्मक अशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने
ASEO च्या रिक्त असलेल्या ३८ पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्या संदर्भात मुख्यालय स्तरावर काम चालू आहे.लवकरच ही रिक्त पदे भरण्यात येतील.
पदोन्नती पॅनल काही तांत्रिक अडचणी मुळे थांबविण्यात आले होत लवकरच तो मुद्दा निकाली लावून पदोन्नती पॅनल घेण्यात येईल याचे आश्वासन मा.महोदया यांनी दिले आहे.
सोलार व स्मार्ट मीटर यांवर ट्रेनिंग सत्र आयोजित करण्याची विनंती केली असता येत्या काही दिवसांत नाशिक येथे ट्रेनिंग घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Pay Parity संदर्भात नव्याने प्रस्ताव बनवून देण्याचे मा. महोदया यांनी सांगितले असून त्या स्वतः या मुद्द्यावर वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.झोनल युनिट ८ ची मागणी केली त्यावरही मा.मोहदया उत्तम प्रतिसाद दिले तसेच नाशिक कार्यालय हे पुन्हा नव्याने स्थापन करणे करिता निवेदन देण्यात आले.
वरील सर्व मुद्द्यावर अत्यंत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून मा. महोदया यांनी या मुद्द्यावर लवकर कारवाई करून हे मुद्दे निकाली काढण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष ड्रेफुल अत्राम, सचिव उदयमित्र इंगळे,उपाध्यक्ष विकास अरिंगळे,सह सचिव कैलास राठोड, प्रवीण रामटेके,सल्लागार संदीप साळुंखे, महिला प्रतिनिधी जयश्री भालेराव हे उपस्थित होते.