राजाराम पोलीसांच्या श्रमदानाने झुडपांची कटाई देत होतंय अपघातांना आमंत्रण वाहनधारक व नागरिकांनी मानले आभार

650

प्रतिनिधी//

अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) ते गोलाकर्जी या मार्गावरील रायगट्टा गावाजवळ दुतर्फा झुडपांचा वेढा घातला होता. रस्ता अरुंद असल्याने या झुडपामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. परिणामी याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात काही नागरिकांनी उप पोलीस स्टेशन राजाराम येथील प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक आनंद आवारे यांचा लक्षात आणून दिलं होतं. त्याचा गांभीर्य लक्षात घेऊन ४ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक निलोत्पल , अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) एम रमेश , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज जी , अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन राजाराम येथील जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस दल गट क्र. ४ नागपूर चे अधिकारी व अंमलदारांनी मिळून सदर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडपांची श्रमदानातून कटाई केली. त्यामुळे रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीसाठी सुरक्षित झाला आहे.

राजाराम (खां) – गोलाकर्जी हा मार्ग आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. महामार्ग खड्डेमय असल्याने कमलापूर, ताटीगुड्डम, छल्लेवाडा जाणारे वाहनधारक याच मार्गाला पसंती देतात. चिरेपल्ली, कोरेपल्ली व राजाराम परिसरातील वाहनधारकांना हा एकमेव मार्ग असून या मार्गावर वाहनाची नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी चारचाकी वाहने एकाच वेळी आल्यास रस्त्यावर जागा उरत नसल्याने या ठिकाणी अपघाताला आमंत्रण देण्यासारखं होते. परंतु त्या झुडपांच्या राजाराम येथील पोलिसांनी श्रमदानातून झुडपे काढून घेतल्याने वाहनधारक व नागरिकांनी पोलीस दलाचे आभार मानले. यावेळी उप पोलीस स्टेशन राजाराम (खां) चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आनंद आवारे, पोलीस उपनिरीक्षक विनोद फाळके व एसआरपीएफ चे अधिकारी शेंडे तसेच जिल्हा पोलीस व एसआरपीएफ चे अंमलदारांनी सहकार्य केले.