#BJP#नॅशनल हॉयवे वरील पथदिवे सुरू करणे, विद्युत पोल स्थलांतरित करून, नाल्यावरील कामे तातडीने पूर्ण करा :खासदार श्री.अशोक नेते

41
दिं. १६ मार्च २०२३
गडचिरोली:- गडचिरोली शहरातील व चामोर्शी रोड लगत नॅशनल हायवेवरील पथदिवे लागलेले असून सुद्धा अद्याप वीज पुरवठा न झाल्याने तथा साईड ड्रेनचे काम रखडलेले असल्याने खासदार श्री
. अशोकजी नेते यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. विवेक मिश्राजी, गडचिरोली नगर परिषदचे  मुख्याधिकारी सूर्यकांत पिडूरकर तथा महाराष्ट्र विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. कुभरे यांना गडचिरोली व चामोर्शी शहरातील तथा ग्रामीण भागातील वरील समस्यांचे तातडीने निराकरण करण्याकरिता
 गडचिरोली येथील खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात खासदार महोदयांच्या सूचनेनुसार तातडीने बैठकीचे आयोजन केले होते. 
या बैठकीचे प्रतिनिधित्व जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनिलभाऊ पोहनकर,स्वीय सचिव रवींद्र भांडेकर,सोशल मिडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांनी केले.
चामोर्शी रोडवरील अंडरग्राउंड विद्युत ओव्हर हेड शिफ्ट करावी, साईड ड्रेनचे अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावे,चौकातील  हॉयमास्ट सुरू करून सौंदर्य करण्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे.साईड ड्रेन व रोड दरम्यानचे समतलीकरण पूर्ण करावे.तसेच सर्व पथदिवे विद्युत पुरवठा करून तातडीने सुरू करण्यात यावे.
याकरिता तीन्ही विभागाने समन्वयक साधून वरील सर्व समस्यांचे तातडीने  मार्गी लावावे‌.असे निर्देश खासदार श्री. अशोकजी नेते यांनी दुरभाष संदेशाद्वारे दिले.
याप्रसंगी नॅशनल हायवे मार्गाचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्राजी, गडचिरोली नगरपरिषद चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिडूरकर, महाराष्ट्र विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.कुंभरेजी तीनही विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.