जिल्हाधिकारी यांनी सावली तालुक्यात भेट देऊन केली पुरपरिस्थिची पाहणी

78

प्रतिनिधी//

सावली चद्रुपर जिल्हात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सावली तालुक्यांमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच सावली तालुका ला पुराचा तडाखा बसला असुन जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब आज 10 जुलै रोजी सावली तालुक्यातील जिबगांव सीर्सी येथे भेट देवुन बाधित क्षेत्राची पाहणी केली यावळी जिल्हाधिकारी यांनी सावली तहसीलदार कार्यालयात तालुका आपत्ती व्यवस्थापन समीतीची बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले आपत्तीला तात्काळ प्रतीसाद व आपत्तीनंतर पुर्व परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट मोडवर राहुन काम करावे आपात्कालीन परिस्थितीत नागरीकांना राहण्याच्या सोहिकरीता गावातील शासकीय निमशासकीय असलेल्या ईमारती तसेच शाळेत/शाळा महाविद्यालये येथे आश्रय देण्याकरीता चांगली व्यवस्था करावी पुर परिस्थितीत रस्ते बंद असल्यामुळे ईतर ठिकाणांवरुन तालुक्याच्या ठिकाणी शाळा महाविद्यालये मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याबाबत्त मुख्याध्यापक/प्राचार्य यांना सुचना द्याव्यात तसेच बाधीत गावात अधिकारी/कर्मचारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणुन नेमणुक करावी रस्त्यावरील खड्या बाबत्त बांधकाम विभागाला सुध्दा त्यांनी सुचना दिल्या
पुढे जिल्हाधिकारी श्री विनयजी गौडा म्हणाले पुर परिस्थिती दरम्यान शेती पीक मनुष्यहाणी, पशुहाणी,घर गोठा विज पडुन झालेल्या नुकसानीची तहशिदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांनी त्वरीत पंचणामे करावे तसेच जे पुल पाण्याखाली गेले आहेत त्याठिकाणी पोलीस विभागाने तात्काळ बरीकेट लावावेत व पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन जिवितहानी होणार नाही याबाबत्त दक्षता घ्यावी पुर परिस्थितीत आपदा मित्र येथील कर्मचारी जिवितहाणी ताळण्याकरीता 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या
यावळी जिल्हाधिकारी विनयजी गौडा यांनी सावली तालुक्यातील जिबगांव सीर्सी साखरी लोढोली हरांबा व व्याहाड बुज वैनगंगा नदी मार्गाची व पुरपस्थिती बाधीत क्षेत्राची पाहणी केली तसेच जिबगांव येथील सरपंच शेतकरी यांचे शी चर्चा संवाद सादले पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी मुल अजय चरडे, तहशिदार प्रांजली चिरडे सावली, गटविकास अधिकारी संजय नैताम, ठाणेदार श्री पुल्लुरवार पोलीस स्टेशन सावली, वैद्यकीय ता अधिकारी श्री चौधरी, मुख्याधिकारी डोये यांचे सह मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती