प्रतिनिधी//
गडचिरोली – सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कॉलनी गोकुळ नगर येथे आषाढी पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ करण्यात आला .
वर्षावास हे आषाढी ते आश्विन पौर्णिमे पर्यंत तीन महिने असते . तथागत बुद्धाला बुद्धत्व प्राप्तीनंतर सारनाथला पंचवर्गीय भिक्खूंना पहले धम्म प्रवचन याच पौर्णिमेला दिले.
आषाढी पौर्णिमेला तथगात बुद्धाचा जन्म झाला , संघ बांधनी याच पैर्णिमेला केली आणि बुद्धाचे महापरिनिर्वान याच पैर्णिमेला झाले . तथागत बुद्धांनी या पौर्णिमेला जगाला दुःखमुक्तीचे ज्ञान दिले म्हणून या पैर्णिमेला गुरु पौर्णिमा सुद्धा म्हणतात .
सम्राट अशोक बुद्ध विहार परिसरातील उपासिकांनी त्रिशरण पंचशिल ग्रहण करून उपोसथ केले. अध्यक्ष बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर होते . मार्गदर्शक दामोधर शेंडे , निशा बोदेले , निता उंदिरवाडे होते .
भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष यांनी वर्षावासाचे महत्व समजावून सांगितले . यावेळी निशा बोदेले , निता उंदिरवाडे यांनी आषाढी पौर्णिमेबद्दल माहिती सांगितले.
या कार्यक्रमाला गौतम साखरे , कृष्णा भैसारे ,अरुणा उंदिरवाडे , शुभांगी देवगडे , तिलीसमा शेंडे , तक्षक शेंडे , सुलोचना साखरे , प्रियंका साखरे , मंगेश अलाम , वनिता मेश्राम , अमिता भैसारे , सुरेखा ठाकुर ,प्रेमलता कान्हेकर , पुणम खोब्रागडे , कोमल भैसारे , मंगला बाबनवाडे ,रत्नमाला वाळके, उपस्थित होते.