**गडचिरोली, 9 जुलै 2025:**
संयुक्त किसान मोर्चा आणि विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या आवाहनानुसार देशभर पुकारण्यात आलेल्या **कामबंद आणि धरणे आंदोलनाच्या** पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात **21 प्रमुख रस्ते बंद** असताना देखील आंदोलनस्थळी **महिला कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, सफाई कामगार, अंगणवाडी व आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित** राहिल्या. यावेळी “अन्याय, शोषण आणि खाजगीकरणाच्या विरोधात” जोरदार घोषणा देण्यात आल्या.
### **आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या:**
* जन सुरक्षा विधेयक रद्द करा
* चारही श्रम संहितांचा रद्दबातल करा
* खाजगीकरणाचा सपाटा थांबवा
* सर्व कामगारांना किमान ₹26000 मासिक वेतन लागू करा
* शेतकरी, कामगार, असंघटित मजुरांना ₹10,000 मासिक पेन्शन लागू करा
* आशा, अंगणवाडी व नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या
* जिल्ह्यात किमान वेतनाची अमलबजावणी करा
* कंत्राटी पद्धत पूर्णतः बंद करा
* BNEGA (शहरी मनरेगा) कायदा तत्काळ लागू करा
* शेतकऱ्यांचे जबरदस्तीने जमीन अधिग्रहण थांबवा
या आंदोलनात सहभागी होत कामगार नेते कॉ. रमेशचंद्र दहिवडे,कामगार नेते कॉ. देवराव चवळे, माकपा जि. सचिव कॉ. अमोल मारकवार, भाकपा जि.सहसचिव व AIYF चे राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार ,AISF चे कॉ. सुरज जकुल्लवार, शेकाप नेते भाई रामदास जराते आसपा चे नेते धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, किशोर जामदार, विठ्ठल प्रधान आदींनी मार्गदर्शन केले.
पुरपरिस्थितीतही संघर्षासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या **महिलांची उपस्थिती विशेष ठळक** होती. आंदोलकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद करत **जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर** केले.
हे आंदोलन जिल्ह्यातील जनतेच्या सन्मान, सुरक्षितता व हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाचे ज्वलंत प्रतीक ठरले आहे.