छल्लेवाडा येथे मदर तेरेसा महिला प्रभाग संघ कमलापूर च्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

284

प्रतिनिधी//

कार्यक्रमाचे अध्यक्षा लक्ष्मीताई श्रीरामवार यांच्या अध्येक्षतेखाली कार्यक्रम आयोजित.

छल्लेवाङा:अहेरी तालुक्यातील कमलापूर जवळील छल्लेवाडा येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केलेले आहे, या सर्व साधारण सभेमध्ये मंचावर उपस्थित सचिव सपनाताई मारकवार तसेच कोषा अध्यक्षा मुन्नी भेगम उपस्थित होते, तर सपनाताई मारकवार यांनी वार्षिक लेखा जोखा वाचून दाखवण्यात आले आहे.तसेच प्रेमीला दुर्गे यांनी सुद्धा वार्षिक लेखा जोखा वाचून दाखविण्यात आले आहे.राजाराम ग्रामपंचायत पंचायतचे सरपंचा मंगलाताई आत्राम, कमलापूर सरपंचा रजनीताताई मडावी, गुड्डीगुडम सरपंचा सरोजा अनिल पेंदाम, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तालुका व्यवस्थापक सतिश उमरे, मुन्नीताई चापले उपस्थित होते.तर कमलापूर परिसरातील दामरंचा, आशा, नैनर, मोदूमद्गु, रेपणपल्ली, गुंडेरा, गोलाकर्जी, निमलगुडम, गुड्डीगुडम, रायगट्टा, राजाराम, मरनेल्ली, इत्यादी गावातील उमेदचे महिला कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.