मूलचेरा तालुक्यातील प्रवाशांचे बेहाल ! करावी लागते प्रतीक्षा तासोन तास

94

प्रतिनिधी

मूलचेरा :- तालुक्यात मुख्य मार्गावर प्रवासीयांना एसटी महामंडळा च्या पुण्याईने तासोन तास करावी लागते प्रतीक्षा.
अहेरी मूलचेरा चंद्रपूर मार्गे ये जा करणाऱ्या एस टी महामंडळाच्या ‘बसांला वेळेचे बंधन का नाही’ प्रवाशांना बाहेरगावी रुग्णालयात, तालुक्यातील सरकारी कार्यालयात, रोजगारासाठी बाहेरगावी ये जा करणे गरजेचे आहे.परंतु महामंडळाच्या बसेसचे प्रतीक्षा करून करून प्रवासांचे बेहाल होत आहे .प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे .बसेस ने ये जा करणाऱ्या प्रवाशांना उन्हातानाचा त्रास आणि आता अवकाळी पावसाचा अशा परिस्थितीमध्ये प्रवाशाची जीवोपाळ धावपळ होत आहे
यात जीव हानी झाल्यास एस टी महामंडळ जबाबदारी घेणार का ? प्रशासनाने आणि अहेरी अगार बसस्थानकानी अहेरी मूलचेरा चंद्रपूर या मार्गावर कमीत कमी किमान दोन बसेसची वाढ करावी जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाही.
याकरिता प्रशासन पुढाकार घेणार का असा प्रश्न अहेरी मुलचेरा चंद्रपूर मार्गे ये जा करणाऱ्या प्रवाशांना पडलाआहे