मुलचेरा तालुका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा नवीन कार्यकारिणी गठित.

44

*मुलचेरा:* तालुक्यातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची नवीन कार्यकारिणी युवा जिल्हाअध्यक्ष कुणाल भाऊ कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत कऱण्यात आली.

संघटनेच्या ध्येय-धोरणांना गती देण्यासाठी आणि नेतृत्वात नाविन्य आणण्यासाठी नुकतीच नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्षांसह तरुण व अनुभवी सदस्यांचा समावेश असलेली ही टीम आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी व संघटनेच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली असून, सभासदांनी सहकार्याचे आवाहन केले आहे.
*नवीन कार्यकारिणी गठित*
एक नवी भरारी
समाजातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या संघटनेसाठी नवीन कार्यकारिणी ही नवचैतन्याची लाट घेऊन येते. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (ABAVP) जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतर, पारदर्शक प्रक्रियेद्वारे नवीन पदाधिकारी आणि सदस्यांची निवड करण्यात आली.

*नवीन कार्यकारिणीचे मुख्य उद्दिष्ट*

*संघटनेचा विस्तार* : ग्रामीण आणि शहरी भागात संघटनेचे जाळे वाढवणे.
*युवा नेतृत्व* : तरुणांना पदे देऊन त्यांच्यातील कल्पकतेला प्रोत्साहन देणे.
*पारदर्शकता* : आर्थिक व्यवहारांमध्ये आणि कामकाजात पारदर्शकता राखणे.
*नवीन उपक्रम* : डिजिटल क्रांतीचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचणे.
*आगामी कार्ययोजना* :
नवीन टीमने पदभार स्वीकारताच, पुढील ६ महिन्यांसाठीचे नियोजन केले आहे. यामध्ये मुख्यत्वे सभासदांशी थेट संवाद, समस्यांचे त्वरित निवारण आणि सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर दिला जाईल.

*नविन कार्यकारिणी सदस्य*
*अध्यक्ष* : कालिदास भाऊ कुसनाके
*उपाध्यक्ष* : संदिप भाऊ तोरे
*कार्याध्यक्ष* : काशीनाथ दादा मडावी
*सहसचिव* : राकेश भाऊ मरापे
*संघटक प्रमुख* : महेन्द्र भाऊ आत्राम
*महासंपर्क प्रमुख* : प्रकाश भाऊ आलाम
*सोशल मीडिया प्रतिनिधी* :केजिकराव आरके

अशा प्रकारे निवड करण्यात आले त्या प्रसंगी चामोर्शीचे तालुका उपाध्यक्ष सुमित कुमरे, एटापलीचे तालुका अध्यक्ष गिरीश झोगे,अरविंद पेंदाम व धनराज आलाम तालुकक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

ही नवीन कार्यकारिणी आपल्या अनुभवाच्या जोरावर संघटनेला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर नेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.