माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून किडनीच्या आजाराने ग्रस्त प्रितीश बिश्वास यांना आर्थिक मदत.

121

*मुलचेरा:-* तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत देवनगर येथील रहिवासी प्रितीश प्रेमानंद बिश्वास हे अनेक महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेला खर्च उचलणे कठीण झाले होते.

ही बाब विवेकानंदपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच तपनजी मल्लिक यांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या निदर्शनास आणून दिली.परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन राजे साहेबांनी तात्काळ आर्थिक मदत पाठवून बिश्वास कुटुंबाला मोठा आधार दिला.

या मदतीबद्दल बिश्वास कुटुंबीयांनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.!

यावेळी तपन मल्लिक,पारितोष बिश्वास, समर बैरागी,इंद्रजित बिश्वास,श्रीनिवास मल्लिक,रॅबिन रॉय,किशोर मल्लिक आदी उपस्थित होते.!!