निमलगुडम होणार सुसज्ज हनुमान मंदिर मंदिर बांधकामाचे भूमिपूजन

186

अहेरी: तालुक्यातील निमलगुडम येथे आज दिनांक ३१ मार्च रोजी महावीर जयंती चे औचित्य साधून श्री हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन परम पूज्य शंकर महाराज यांच्या विधी व मंत्रोच्चाराने भूमिपूजन करण्यात आले आहे.
आजच्या घडीचे धावपळीच्या जीवनात श्रद्धा व भावना जपण्यासाठी एकांत व मन शांती साठी एकमेव स्थळ म्हणजे मंदिर हे केंद्र बिंदू होय तसेच गावात धार्मिक वातावरण व संघटित होण्यासाठी गावात हनुमान मंदीर बांधकाम करून मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याचे निर्णय घेतला व भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आले आहे.
या प्रसंगी नागेश शिरलावार, आनंदराव कोडापे, साईनाथ मडावी, माधव बामनकर, सुकरू तलांडी,श्रीधर दुग्गीरालापाठी,राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, रमेश बामनकर, विनोद मडावी,व्येंकटेश शिरलावार, किशोर शिरलावार,सचिन आत्राम, सखाराम बामनकर,राकेश बामनकर, अशोक कोडापे, नागेश कोडापे तसेच गावातील महिला पुरुष उपस्थित होते.