प्रतिनिधी//
*अहेरी:-* पंधरवड्यापुर्वी आलेल्या वादळापासुन विस्कळीत झालेली विजपुरवठा व्यवस्था आजवर सुरळीत झाली नाही. ऊलट त्यानंतर समस्या वाढतच जात आहे.विजेचा सततचा लपंडाव, अपुर्या विद्युत दाबामुळे ऐन ऊन्हाळ्यात कुलर,पंखे काम करीत नाहीत. एकतर ऊकाडा वाढत चालला आहे आणि आठवड्याभरापासुन अहेरीच्या बहुतांश भागातील नागरीकांना विजपुरवठेत खंड पडत असल्याने संपुर्ण रात्र अंधार,ऊकाडा व मच्छर अशा तिहेरी अडचणीला सामना करावा लागत असुन नागरीक बेजार झाले आहेत. विद्युत यंत्रांवर अबलंबुन असणारे सेतु केंद्र, झेराॅक्स सेंटर व आईस्क्रीम पार्लर सारख्या व्यवसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे.वारंवार सांगुनही समस्या सुटत नसल्याने भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक दिली आणि सहायक अभियंत्यांना धारेवर धरले. जवळपास ५० वर्ष जुने विद्युत कंडक्टरवरच काम भागविल्या जात असल्याचे समोर आले. तात्काळ विद्युत वितरणामध्ये विभागणी करुन विशिष्ठ रोहित्रांवरचा अतिरीक्त भार कमी करुन सेवा सुरळीत करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, माजी तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार, नगरसेवक विकास ऊईके व संजय पोहणेकर,शंकर मगडीवार, सुर्यकांत ठाकरे, श्रीनिवास संगमवार, महेश रामगिरकर, संतोष संगमवार,संतोष बुग्गावार, सिध्देश सिडाम इ अनेक कार्यकर्ते व अहेरीकर नागरीक ऊपस्थित होते.