प्रतिनिधी//
*अहेरी:-* तालुक्यातील पांचाळ समाज सेवा समिती तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमद विराट पोतलुरी वीर ब्रम्हेन्द्र स्वामीजी यांचा ‘आराधना महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन कारण्यात आलं होत.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज हे होते.यावेळी त्यांनी मोठया भक्तीभावाने पूजा अर्चना करून श्रीमद विराट पोतलुरी वीर ब्रम्हेन्द्र स्वामीजीचा आशीर्वाद घेतला.येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा हा प्रगती पथावर असुद्या आणि सर्वसामान्य जनतेच्या संपूर्ण समस्या दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी श्रीमद विराट पोतलुरी वीर ब्रम्हेन्द्र स्वामीजी यांची प्राणप्रतिष्ठा,कलश यात्रा,मिरवणूक आणि महाप्रसाद यांचं वितरण यावेळी करण्यात आलं.
त्यावेळी कार्यक्रमाला युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,नंदू गणमुक्कुलवार,राजेश्वर रंगुलवार,प्रशांत गणमुक्कुलवार,नानाजी जक्कोजवार,शामला बेजनकीवार, अंजली ताई कत्रोजवार आणि पांचाळ समाज मंदिर समितीचे पदाधिकारी,सदस्य,महिला वर्ग आणि मोठया संख्येने युवक-युवती उपस्थित होते.!!👇