कोरेपल्ली रस्त्याच्या काम निकृष्ट दर्जाचे रस्त्याच्या कामाचे उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावे श्रीधर दुग्गीरालापाटी सामाजिक कार्यकर्ता यांची मागणी.

43

अहेरी: कमलापूर-मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत असा ते कोरेपल्ली रस्त्याचे काम सुरू असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे शिवाय गेल्या दोन वर्षापासून सदर कामात अवैध्य मुरूम उत्खनन करून शासनाच्या करोडो रुपयाचा महसूल बुडवलेला आहे ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने गाव तेथे रस्ता हे धोरण ठरवीत प्रत्येक गावात रस्ता पोहोचावे यासाठी प्रयत्नशील असताना अनेक गावातील रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काही वर्षातच सदर रस्ता खराब होतो ग्रामीण भागातील जनता सुशिक्षित नसल्याकारणाने याचा गैरफायदा घेत कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न करीत असतात संबंधित अभियंता हे देखील दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था होत असतात यामुळे कोरेपल्ली रस्त्याचे उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दुग्गीराला पाटी याने केले असून याबाबत जिल्हाधिकारी मुख्य वनसंरक्षक तसेच वनमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून चौकशी न झाल्यास उपोषणाला देखील बसणार असल्याचे कळविले आहे